फक्त मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य वधुवर सूचक केंद्र
आदर्श मराठा वधुवर सूचक केंद्राचे नियम
आदर्श मराठा वधुवर सूचक केंद्रात फक्त मराठा समाजाच्या वधुवरांची नोंदणी केली जाते.
येथे मोफत नांव नोंदणी केली जाईल. नांव नोंदणी करुन तुमची संपूर्ण माहिती वेबसाईटवर प्रसारीत केली जाईल.
नांव नोंदणीसाठी केंद्राचा नोंदणी अर्ज www.adarshmaratha.com या वेबसाईट वरुन फोटोसह संपूर्ण पणे भरुन पाठवा किंवा केंद्रात येंऊन फोटो व आधार कार्डच्या फोटोसह नोंदणी अर्ज भरुन दयावा.
ज्या सभासदांनी फि भरलेली आहे, त्या सभासदांना तुमची माहिती अनुरुप वाटल्यास ते तुमच्याशी संपर्क करु शकतात.
तुमच्याशी संपर्क केलेल्या सभासदाशी तुमचे लग्नं जुळून आल्यास फि भरण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला आमच्या वेवसाईट वरील स्थळे अनुरूप वाटल्यास त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी तुम्हाला त्यावेळी असणारी फि भरावी लागेल.
नांव नोंदणी साठी सभासदाच्या आधार कार्डचा फोटो पाठविणे आवश्यक आहे.
केंद्राची वार्षीक फि रूपये २७००/- इतकी आहे. परंतु सध्याचा सवलतीचा दर रूपये २०००/- इतका आहे. ( सवलत मर्यादीत कालावधीकरीता ) ही फि फक्त एक वर्षासाठी आहे. सदरची फि केंद्रामध्ये येऊन रोखीने भरता येईल किंवा आमच्या ICICI बॅकेंच्या खात्यावर नेटबॅकींग, रोखीने किंवा चेकने भरता येईल. चेक "आदर्श मराठा वधुवर सूचक केंद्र" ( Adarsh Maratha Vadhuvar Suchak Kendra ) या नांवाने द्यावा. ICICI Bank Current Account No. 198005001947, Branch Somwar Peth Karad, IFSC Code ICIC0001980 या खात्यावर फि भरल्यानंतर फोन करून किंवा ई मेलने व्यवहाराची माहिती, ठिकाण, बॅकेंचे नांव इत्यादी कळवावे.
एकदा भरलेली फि कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही.
फि भरल्यानंतर आपणास अनुरुप असणाऱ्या स्थळांशी संपर्क करण्यासाठी वेबसाईट वरील प्रतीसाद ऑप्शन मध्ये आपला नोंदणी क्रमांक व नोंदविलेला ई मेल टाकल्यास आपण निवडलेल्या स्थळांचे नांव, पत्ता, मोबाईल नंबर, ई मेल इत्यादी माहिती आपणास त्वरीत मिळते.
प्रतीसाद या ऑप्शनद्वारे आपण माहिती घेतलेल्या सर्व स्थळांना आपली माहिती आमच्या मार्फत त्वरीत ई मेलने दिली जाते.
केंद्रातून एका सभासदाला दररोज त्यांचे स्थळाला मॅच होणारे तीन बायोडाटा घेता येतील.
वेबसाईट वरील शोध या ऑप्शन मधून वर किंवा वधू हे ऑप्शन click केल्यानंतर वर किंवा वधुचे रजिस्टर नंबर येतील. रजिस्टर नंबरवर click करताच स्थळाची वय, उंची, शिक्षण, फोटो, नोकरी किंवा व्यवसायाचे ठिकाण, मूळगांव, सध्या राहाण्याचे ठिकाण, नातेवाईक, अपेक्षा, मंगळासह पत्रीकेतील सर्व माहिती मिळते.
केंद्राच्या वेबसाईट वरील फोटो बदल मधून आपला फोटो बदलता येतो. आपल्या माहितीमध्ये काही बदल करावयाचा असल्यास तसे ई मेल ने कळवावे लागेल.
विवाहयोग केंद्रामार्फत किंवा स्वप्रयत्नाने जुळून आल्यावर त्या संबधीची माहिती केंद्रास ई मेलने कळवावी.
आपण घेतलेल्या स्थळाच्या माहितीची खातरजमा आपले नातलग, मित्रमंडळी यांचेमार्फत स्वतः करून घ्यावी.
नांव नोंदणीनंतर विवाह अमुक दिवसात जमेल याची खात्री देता येणार नाही.
केंद्रातुन घेतलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करू नये. गैरवापर केल्याचे आढळल्यास संबधीत सभासदाचे सभासदत्व रद्द केले जाईल.